Posts

वाजवी निर्बंध विरुद्ध न्यायिक टिप्पणी: सरन्यायाधीशांच्या वादग्रस्त विधानाचे समग्र विश्लेषण

Image
वादग्रस्त विधान आणि हिंदू भावनांचा आक्रोश १६ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी केलेलं वादग्रस्त विधान पुढील प्रमाणे "This is purely a publicity interest litigation. Go and ask the deity himself to do something.If you are saying that you are a strong devotee of Lord Vishnu, then you pray and do some meditation." बरं हे विधान केल्यानंतर त्यांच्या वर समाजमाध्यमांवर व बातम्यांमध्ये त्यांच्यावर बरीच टीका झाली. आपल्यावर टीका होते आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी जे वादग्रस्त विधान केलं होतं त्यावरती सकल हिंदू समाजाची क्षमा न मागता उलट त्यांनी मी सर्व धर्मांचा आदर करतो असं सपष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट राकेश किशोर यांनी भर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकून मारला. आणि बूट फेकून मारल्यावर त्यांनी घोषणा केली की "सनातन ...

ट्रम्प तात्यांच्या टॅरिफचं तुणतुणं : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा आढावा

Image
२० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळिसावे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार प्रणाली पूर्णपणे बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. २० जुलै २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून पहिले सहा महिने पूर्ण केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सहा महिन्यात विविध देशांच्या विविध वस्तूंवर टॅरीफ अर्थात आयात शुल्क लावून व्यापार युद्ध सुरु केले आहे. आता लोकांना वाटेल की ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विविध देशांवर आक्रमकपणे आयात शुल्क (टॅरीफ) लादत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की ते फक्त त्यांच्या पहिल्या कार्यकाळात वापरलेली टॅरीफ रणनीती पुढे चालू ठेवत आहेत. थोडक्यात काय तर ट्रम्प त्यांच्या टॅरीफचं तुणतुणं परत एकदा वाजवत आहेत. या टॅरीफ युद्धाची सुरुवात २०१७ साली झाली. ट्रम्प प्रशासनाच्या सर्व कृतींच्या मुळाशी एक मध्यवर्ती धोरण आहे आणि ते धोरण म्हणजे अमेरिका फर्स्ट "America First". अमेरिका फर्स्ट या धोरणाचा अर्थ काय तर अमेरिकन व्यवसाय आणि कामगारांना प्राधान्य देणे....

माणूस नावाचं सुंदर शिल्प: यशाची व व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली

Image
पुस्तकाचे लेखक हे भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल आहेत. १९७१ साली ते भारतीय सेनेत जेव्हा अधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा पासून 'मानवी विकास आणि प्रतिसाद' हा त्यांचा आवडीचा विषय आहे. लेखकाने आयुष्यातील वेगवेळ्या टप्प्यांवर म्हणजेच बालपणापासून ते प्रौढत्वा पर्यंत माणसाच्या वागण्याचा, स्वभावाचा व तो देत असलेल्या प्रतिसादाचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं आणि माणसातले गुण-दोष हे अधून मधून डोकं वर काढतात. पण जर मुक्या प्राण्यांना प्रशिक्षण देऊन बदलता येऊ शकतं तर हे माणसाच्या बाबतीत पण सहज शक्य आहे. आणि या सकारात्मक बदला करता गरज आहे चांगल्या वातावरणाची आणि सहेतुक व सातत्यपूर्ण परिश्रमाची. हल्लीच्या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला एका विशिष्ठ चौकटीत बांधून ठेवलं आहे. अमुक अमुक एक अभ्यासक्रम आणि अमुक अमुक एवढे गुण तुला परीक्षेत मिळाले की तू हुशार. थोडक्यात सांगायचं झालं तर आजची शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी नाही तर परीक्षार्थी घडवत आहे. एक चांगला विद्यार्थी असणं हे सुजाण नागरिक होण्याच्या प्रक्रियेतील पाहिलं पाऊल आहे. लेखकाच्या अनुस...

यमाष्टकम : कर्म, धर्म, व उत्क्रांतीचं रहस्य उलगडणारं अष्टक

Image
 यमधर्मांच्या स्तुती प्रीत्यर्थ ज्या अष्टकाची रचना केली गेली त्याला "यमाष्टक" असं म्हणतात. मानवाच्या कर्मप्रधान जीवनात लागणारी "नैतिक तत्त्वं" आणि त्याच नैतिकतेच्या आधारावर होणारी "मानवाची उत्क्रांती" याबद्दल यमाष्टक भाष्य करतं. या यमाष्टकाची रचना करताना व त्यातील श्लोकांचे अर्थ समजावताना लेखकाने आपल्या सनातन हिंदू धर्मातील "योग वाशिष्ठ", "ऋग्वेद", "ऐतरेय उपनिषद", "कठोपनिषद", "दुर्गासप्तशती", "पातंजल योग दर्शन"  या प्राचीन ग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत. आता यमाष्टक समजून घ्यायचं असेल तर आधी 'यम' म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. 'यम' हा शब्द 'यमन' या शब्दातून निर्माण झाला. मनाला नियंत्रित व संयमित करून चांगलं वळण लावणे म्हणजेच यमन करणे होय आणि हे यमन ज्याने सर्वप्रथम केलं तो म्हणजे यम. यमाष्टकाची सुरुवात ही परमेश्वराच्या पंचकृत्यांच्या उल्लेखाने होते. ही समस्त सृष्टी या पंचकृत्यांवर आधारित आहे. मानवाची उत्क्रांती ही त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते आणि ही 'नीतिमत्ता...

भारतीय ज्ञान परंपरेत "अनावश्यक" वाटत असलेल्या "पौराणिक कथांची" आवश्यकता.

Image
  ३ डिसेंबर २०२३ चा रविवार महाराष्ट्र टाइम्स वाचत असताना दुसऱ्याच पानावर एक बातमी वाचली त्याचं शीर्षक होतं "ज्ञानपरंपरेत पुराणकथा नकोत". हे शीर्षक वाचताक्षणी ठरवलं की आता पूर्ण बातमी वाचायचीच. बातमीच्या सुरुवातीलाच "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमात पौराणिक कथांचा समावेश न करता सांस्कृतिक वारसा, नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती, पुरातन जीवन शैली, थोर शास्त्रज्ञांचा अभ्यास या घटकांचा समावेश करणे अपेक्षित आहे" असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. पूर्ण बातमी वाचून झाल्यानंतर देखील बराच वेळ डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल विचार चालू होता. साहजिकच मला पहिला प्रश्न हा पडला की भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमात पुराणकथा नकोत असं डॉ नितीन करमळकर का बोलले असावेत ? पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री नितीन करमळकर मला वैयक्तिक पातळीवर तरी डॉ नितीन करमळकर यांचं हे वक्तव्य अजिबात पटलेलं नाही. आता डॉ. करमळकरांचं मत का पटलं नाही यासाठी आधी आपल्याला “Indian Knowledge system” अर्थात भारतीय ज्ञान परंपर...

India vs Pakistan Asia Cup 2022 : Some Improvements & Some Iteration Of Past Mistakes

Image
  Currently in the Asia Cup tournament, India has defeated Pakistan by 5 wickets. India and Pakistan are the fiercest opponents in the cricket world. Till date no cricket match has ever been and never could be as thrilling as India Pakistan match. If you look at the records of India vs Pakistan cricket matches, be it One Day International, 50 or 20 overs World Cup, or T20 format, India has usually been one step ahead of Pakistan. As per the time table of Asia cup 2022 it was decided that india will face Pakistan on 28th august and after the announcement of match, discussions about match started. But most common question in all the discussions was whether shaheen afridi is a part of playing eleven or not? And it’s very natural if this question arises in anyone’s mind, the reason is he is the guy who with his staggering bowling despatched top batting order of indian cricket team to pavilion in T20 World Cup of 2021. But in present instances because of his knee injury shah...

Social Media : The Another Realm

Image
Rise and boom of social media: 2020 the 3rd decade of 21st century. We have accomplished quite a lot of amazing feats that Humans at one time never anticipated. If we look back at earlier 2 decades we can see that a new dimension came in human life which is called "social media". Smart phones along with social media became a part and parcel of human life. Truly social media came to life with the rise of SmartPhones. It seems that the journey from email to various messenger apps was covered within a blink of an eye. Social media catched a grip in our lives during the years from 2003 to 2009 and the rise of social media platforms led to an increase of social outreach of people and a decline in “Actual Human Interactions and Compassions”. In the post globalized world, social media not only emerged as means of communication but also a free tool of marketing, spreading information and a very legal form of dopamine hit. Social media became an integral part from personal...