वाजवी निर्बंध विरुद्ध न्यायिक टिप्पणी: सरन्यायाधीशांच्या वादग्रस्त विधानाचे समग्र विश्लेषण


वादग्रस्त विधान आणि हिंदू भावनांचा आक्रोश
१६ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी एक वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी केलेलं वादग्रस्त विधान पुढील प्रमाणे "This is purely a publicity interest litigation. Go and ask the deity himself to do something.If you are saying that you are a strong devotee of Lord Vishnu, then you pray and do some meditation." बरं हे विधान केल्यानंतर त्यांच्या वर समाजमाध्यमांवर व बातम्यांमध्ये त्यांच्यावर बरीच टीका झाली. आपल्यावर टीका होते आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी जे वादग्रस्त विधान केलं होतं त्यावरती सकल हिंदू समाजाची क्षमा न मागता उलट त्यांनी मी सर्व धर्मांचा आदर करतो असं सपष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍडव्होकेट राकेश किशोर यांनी भर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकून मारला. आणि बूट फेकून मारल्यावर त्यांनी घोषणा केली की "सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान" बूट फेकून मारल्याच्या घटनेनंतर हे प्रकरण अजून चिघळलं. बूट फेकून मारल्याच्या घटनेनंतर कोण चूक कोण बरॊबर याच्यावरून वाद सुरु झाला आणि जेव्हा एखाद्या विषयावर वाद सुरु होतो त्यावेळी जुने-नवे असे सर्व मुद्दे त्या विषयाशी जोडण्याच्या प्रयत्न केला जातो. आता कोण कोणते मुद्दे या विषयाशी जोडले गेले आहेत ते आपण पाहूया.

बूट फेकण्याची घटना: भारत आणि जगातील इतिहास
आता भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फेकून मारला म्हणून काही लोकांनी त्या वकिलाची निंदा केली. पण आता दोन प्रश्न उपस्थित होतात की बूट फेकून मारण्याची घटना ही जगात किंवा भारतात पहिल्यांदा घडली आहे का? आणि सरन्यायाधीश बी.आर.गवई हे पहिले भारतीय आहेत का ज्यांच्यावर बूट फेकून मारला गेला? तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. १९८४ साली भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. ही हत्या झाल्यानंतर भारतात विविध ठिकाणी शीख विरोधी दंगल सुरु झाली. या दंगली मध्ये काही निष्पाप लोक मारले गेले. २००९ साली भारतात काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. एप्रिल २००९ रोजी शीख पत्रकार जरनैल सिंग यांनी १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ त्यावेळी भारताचे गृहमंत्री असलेले पी चिदंबरम यांच्यावर बूट फेकून मारला होता. १४ डिसेंबर २००८ रोजी इराकी पत्रकार मुंतधर अल जैदी यांनी अमेरिकेने इराकवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यावर बूट फेकून मारला होता.

सरन्यायाधीशांचे वादग्रस्त वक्तव्य: अभिव्यक्ती स्वातंत्र्य की संविधानाचा अपमान?
न्यूटनचा तिसरा नियम असा आहे की For every action there is equal and opposite reaction. सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केले ते त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे आणि तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केले आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसून केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या क्रियेवर प्रतिक्रिया येणं हे स्वाभाविक होतं. जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर विराजमान असलेला/असलेली व्यक्ती हिंदू धर्माबद्दल, हिंदू देवतांबद्दल किंवा हिंदू प्रथांबद्दल जेव्हा वादग्रस्त विधानं किंवा मतप्रदर्शन करतात तेव्हा ती केवळ वादग्रस्त विधानं किंवा वैयक्तिक मतं होत नाहीत तो एक सामाजिक व वैचारिक संदेश बनतो. भारतात काही समाज कंटक आहेत जे कोणतीही कॉन्ट्रोवरसी घडली की त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात. काही समाज कंटक हे आता असा नॅरेटिव्ह पसरवत आहेत की सरन्यायाधीश हे नवबौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांच्या वर हल्ला झाला आहे. तर सरन्यायाधीश हे नवबौद्ध आहेत म्हणून त्यांच्या वर हल्ला केला नाही आहे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला आहे. भारताचे सरन्यायाधीश हे दलित समाजातून आले असून त्यांच्या वैचारिक पाय हा आंबेडकरवादी बौद्ध परंपरेशी जोडलेला आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीमागे एक ऐतिहासिक व वैचारिक पार्श्वभूमी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांच्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मा स्वीकारला. जेव्हा डॉ आंबेडकरांनी बौद्ध धर्मा स्वीकारला तेव्हा त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी २२ प्रतिज्ञा घेतल्या. या २२ प्रतिज्ञांचा उद्देश होता जातिव्यवस्थेचा त्याग आणि समतेचा स्वीकार पण दुर्दैवाने काही अनुयायांनी या प्रतिज्ञांचा "हिंदू धर्माचा द्वेष" असा चुकीचा अर्थ घेतला. भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदू धर्माचे उपप्रवाह आहेत. म्हणजेच भारतीय संविधानाने बौद्ध धर्माला हिंदू धर्माशी जोडले आहे. भारतीय संविधान हे सर्वधर्मांचा आदर करायला शिकवते.

भारतीय राज्यघटनेतील कलम १९ ते २२ स्वातंत्र्याच्या अधिकाराशी (Right to Freedom) संबंधित आहेत. कलम १९ अंतर्गत भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पण याच कलम १९ मध्ये समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध (Reasonable Restrictions) लावण्यात आले आहेत. पण इथे हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी करताना सरन्यायाधिशांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असलेल्या वाजवी निर्बंधांचा विसर पडलेला दिसतो आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे भारतीय संविधानाचे अंतिम व्याख्याकार आहे आणि भारतीय संविधानाच्या व्याख्याकाराचं काम हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश करतात. पण जर भारतीय सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशच जर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाच्या पदावर बसून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असलेल्या वाजवी निर्बंधांची मर्यादा पाळणार नसतील तर हा भारतीय संविधानाचा सर्वात मोठा अपमान आहे.

सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश हे संविधानाचे रक्षक आहेत. पण जर एखादा सरन्यायाधीश जर हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान करत असेल तर सरन्यायाधीशांची ही क्रिया संविधानाच्या तत्वज्ञानाशी विसंगत ठरते. जर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश धार्मिक भावनांना ठेच पोचवणारी वादग्रस्त वक्तव्य करायला लागले तर समाजात असंतुलन निर्माण होईल. सरन्यायाधिशांना इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही अधिकार भारताच्या राज्यघटनेने दिला नाही. न्यायाधीश हे समाजात नैतिकतेचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. न्यायाधीश हा जाती धर्माच्या पलीकडे असतो. न्याय निवाडा करताना न्यायाधीशाने त्यांचे वैयक्तिक विचार, विचारसरणी, धर्म, जात, पंथ या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन निष्पक्ष राहून न्याय निवाडा करणं गरजेचे आहे.

हिंदुत्वाच्या लढाईत संयम की आक्रमकता: एक चिंतन
ऍडव्होकेट राकेश किशोर यांनी बूट फेकून मारल्यावर घोषणा केली होती की ''सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान". त्यांच्या या घोषणेवरून समाजमाध्यमांवर काही लोकांनी हे प्रकरण हिंदुत्वाशी जोडलं आणि त्यावरून समाजमाध्यमांवर एक नवा वाद सुरु झाला. काही लोकांच्या मते ऍडव्होकेट राकेश किशोर यांची कृती बरोबर होती तर काहींच्या मते ऍडव्होकेट राकेश किशोर यांची कृती चुकीची होती. जेव्हा कधी हिंदूंच्या बाबतीत कोणतीही वादग्रस्त घटना घडते आणि हिंदू समाज त्यांच्या हक्कांसाठी जेव्हा कुठे थोडा आक्रमक होतो त्यावेळी एक गोष्ट नेहमी घडते ती म्हणजे आपल्याच हिंदू समाजातील काही मंडळी "हिंदूंनी आक्रमक होणे कसे चुकीचे आहे" हे आपल्याच हिंदू बांधवांना सांगायला जातात.

काही तथाकथित हिंदुत्ववादी मंडळींनी तर बूट फेकून मारण्याच्या घटनेची तुलना नेपाळ मधील जेन झी आंदोलकांसोबत केली आहे. या तथाकथित (स्वयंघोषित) हिंदुत्ववादी मंडळींना सामान्य हिंदूंची हिंसक प्रतिक्रिया दिसते पण ज्या चुकीच्या गोष्टीमुळे ही हिंसक प्रतिक्रिया दिली गेली त्या चुकीच्या गोष्टीबद्दल हे तथाकथित (स्वयंघोषित) हिंदुत्ववादी एक शब्द बोलत नाहीत. मुळात बूट फेकून मारणे आणि जेन झी आंदोलन या दोन्ही घटना वेगळ्या आहेत त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे त्यामुळे बूट फेकून मारणे आणि जेन झी आंदोलन या दोन्ही गोष्टींची तुलना मुळात होऊच शकत नाही. नेपाळ मध्ये आंदोलन करणारे जेन झी आंदोलक हे वैचारिक दृष्ट्या अपरिपक्व आहेत पण भारतातील हिंदूं सुज्ञ आहेत. जर हिंदूंना हिंसात्मक वागायचं असतं तर त्या व्यक्तीने बूट फेकून मारला नसता बुटा ऐवजी कायदा हातात घेऊन हत्याराचा वापर केला असता किंवा कोर्टाची पायरी चढायचा ऐवजी थेट मंदिरात जाऊन मूर्ती स्थापन करू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही कारण हिंदू धर्म हा शांत, संयमी, आणि सहिष्णू आहे. हिंदू धर्म हा शांत, संयमी, आणि सहिष्णू असल्यामुळे सकल हिंदू समाज हा देशाच्या कायद्याचा, संविधानाचा सन्मान करतो.

काही हिंदुत्ववादी लोकांचे म्हणणे आहे की सामान्य हिंदूंना कुठे आक्रमक व्हायचं आणि कुठे संयमाने घ्यायचं हे कळत नाही आणि ते स्वतःच्या हत्याराने स्वतःला जखमी करून घेतात. अशा क्वचितच घटना असतील जिथे हिंदू आक्रमक झाले होते किंवा आहेत, बहुतांश वेळा हिंदूंनी बऱ्याच गोष्टी संयमाने घेतलेल्या आहेत. त्यामुळे या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी तरी सामान्य हिंदूंना कुठे आक्रमक व्हायचं आणि कुठे संयमाने घ्यायचं हे सांगू नये. पुढे हे तथाकथित हिंदुत्ववादी लोकं म्हणतात की हिंदुत्त्वाच्या लढाईचे नियम आपण समजून घेतले पाहिजेत. आता या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित होतात.मुळात हिंदुत्वाच्या लढाईचे नियम कोणते? ते कुणी लिहिले? ते नियम तयार करताना सर्व हिंदुत्ववाद्यांचा या नियमावलीला पाठिंबा होता का? पाठिंबा मिळालेले सर्वच्या सर्व नियम हे सर्व हिंदुत्ववाद्यांना मान्य आहेत का? या लोकांच्या म्हणण्यानुसार चप्पल फेकणे चुकीचे होते, बरं मग त्या ऐवजी काय प्रतिक्रिया द्यायला हवी होती?आणि तुम्ही म्हणता तशी प्रतिक्रिया दिली तर त्यानंतर भविष्यात हिंदू धर्माबद्दल, हिंदू देवतांबद्दल आणि हिंदुप्रथांबद्दल वादग्रस्त व अपमानजनक वक्तव्य होणार नाहीत याची काय गॅरंटी आहे?

पुढे हे लोकं म्हणतात की "काही हिंदूंचा दोष हाच आहे की त्यांना मतभेद असलेला गांधी हा सोयीचा शत्रू वाटतो आणि प्रत्यक्ष हिंदूंचा नरसंहार करणारा जिन्ना मात्र उजळ माथ्याने वावरतो". “गोडसेंच्या बंदुकीला गांधीं दिसला पण जिन्ना दिसले नाहीत, अब्दुल राशिदच्या बंदुकीने मात्र स्वामी श्रद्धानंद अचूक ओळखले.” मोहनदास करमचंद गांधींनी केलेल्या शांतीप्रिय समाजाच्या तुष्टीकरणामुळे लाखो हिंदूंचे नुकसान झाले. हिंदूंनी जिथे आत्मरक्षेसाठी प्रतिकार करणे गरजेचे होते तिथे गांधीं मात्र हिंदूंना आत्मसमर्पण व अहिंसेची एकांगी शिकवण देत होते, पण दुर्दैव हेच की तीच शिकवण मात्र समोरच्या शांतीप्रिय समाजाला त्यांनी द्यायचे टाळले. याच कारणामुळे ज्या हिंदूंचा धर्माभिमान जागृत होता त्यांना शत्रूबोधाचे ज्ञान झाले त्यामुळे त्यांना हे समजले की बाहेरच्या शत्रूला मारण्याआधी घरातल्या भेदीचा बंदोबस्त करणे हे गरजेचे आहे म्हणून गांधींशी त्यांचे शत्रुत्व झाले. आणि उजळ माथ्याने वावरणाऱ्या जिन्नाकडे वैचारिक स्पष्टता होती पण गांधीं मात्र गोंधळले होते. धर्माभिमानी हिंदूंसाठी गांधीं हा सोयीचा शत्रू नव्हता तर तो त्याच्या कर्मांमुळे व विचारांमुळे हिंदूंचा शत्रू झाला होता.

आणि हीच प्रतिकार न करण्याची शिकवण स्वातंत्र्या नंतरच्या काळात हिंदूंच्या नसानसात भरली. यामुळे हिंदूंची त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची इच्छा गेली, त्यामुळे हिंदूंनी त्यांचा आत्मविश्वास गमावला व त्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे कुणीही येतो आणि हिंदू धर्माबद्दल, हिंदू देवतांबद्दल आणि हिंदुप्रथांबद्दल वादग्रस्त व अपमानजनक वक्तव्य करतो.

त्यामुळे हे गांधीवादाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्ववादाकडे पाहणारे किंवा त्याचे आकलन करणारे हे तथाकथित हिंदुत्ववादी हेच हिंदू धर्माला किंवा हिंदुत्वासाठी घातक आहेत. त्यामुळे कोणतीही हिंदुविरोधी गोष्ट घडली तर हीच लोकं जे हिंदू आक्रमक होतात त्यांचे पाय खेचायला किंवा त्यांची टीका करायला सुरुवात करतात, पण ज्या लोकांनी हिंदुविरोधी गोष्ट केली त्यांच्या विरोधात हे काहीही करत नाहीत.

हे गांधीवादाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्ववादाकडे पाहणारे तथाकथित हिंदुत्ववादी तेच काम करतात जे गांधींनी हिंदूंसोबत केलं. गांधीवादाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्ववादाकडे पाहणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या अनुसार एखादा कट्टर हिंदू हा स्वतःची पिल्लं खाणाऱ्या मांजरासारखा आहे, तर याच तर्कानुसार कट्टर हिंदूंसाठी गांधीवादाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्ववादाकडे पाहणारा हिंदुत्ववादी हा मेंढरांना कसायांकडे घेऊन जाणाऱ्या मेंढपाळा सारखा आहे.

सरन्यायाधीश प्रकरणातील 'जाती'चे लेबल आणि डाव्या विचारधारेची घाई
भारतातल्या लेफ्टिस्ट इकोसिस्टिमचं हे वैशिष्ठ्य आहे की कोणत्याही गोष्टीला ते पटकन लेबल लावून मोकळे होतात. उदाहरण द्यायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या एका प्रसिद्ध वकिलाने एक विधान केलं This is dastardly attempt by a lawyer with a "brahmanical mindset" to intimidate CJI. बरं हे एकटेच नाही आहेत, लेफ्टिस्ट इकोसिस्टिम मधल्या एका प्रसिद्ध न्युज वेबसाईटच्या संपादकांनी पण एक विधान केलं आहे, त्यांच्या मते  "Terrorism has no religion but attack on CJI is casteist hate crime".

मराठीत एक म्हण आहे अति घाई संकटात नेई, या दोन्ही लोकांबाबत तसंच काहीतरी झालं. सरन्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा राकेश किशोर खुलासा केला की ते हिंदू दलित समाजाचे आहेत. अशाप्रकारे आता ज्यांनी हल्ला केला आणि ज्यांच्यावर हल्ला झाला असे दोघे ही दलित समाजाचे असल्याने लेफ्टिस्ट इकोसिस्टिमचा या वादाला जातीय रंग देण्याचा डाव परत एकदा फसला. त्यामुळे लेफ्टिस्ट इकोसिस्टिमवाले समतेच्या आणि जातीअंताच्या गप्पा मारतात पण मुळात एखादं वादग्रस्त प्रकरण झाल्यावर सर्वात पहिले जातीची लेबलं लावणारी मंडळी हीच असतात. त्यामुळे जातीअंताच्या वार्ता करणारी लेफ्टिस्ट इकोसिस्टिमच सर्वात मोठी जातीयवादी आहे.

सत्ताधारी पक्षाचं 'हिंदुत्व': सोयीनुसार की प्रामाणिक?
भारतातील सत्ताधारी पक्ष जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो त्याच सत्ताधारी पक्षाचा सर्वोच्च नेता मात्र सरन्यायाधिशाच्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणावर सरन्यायाधीशांची पाठराखण करतात. जर सर्वोच्च नेत्याची प्रतिक्रिया वाचली तर इथे ज्या माणसाने बूट फेकून मारला त्याची ते निंदा करतात पण ज्या सरन्यायाधिशाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारतातील करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या या बद्दल ते काहीही बोलत नाहीत. मग आता असा प्रश्न पडतो की भारतातील सत्ताधारी पक्ष किंवा त्या सत्ताधारी पक्षाचा सर्वोच्च नेता हे खरंच हिंदुत्ववादी आहेत का? का त्यांना फक्त निवडणुकीच्यावेळी ते सोयीने हिंदुत्ववादी होतात? काही लोकांनी हे प्रकरण कंगना राणावतच्या प्रकरणासोबत जोडलं. कंगना राणावतच्या प्रकरणात तिच्यावर हल्ला करणाऱ्या सी.आय.एस.एफ च्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं. आता कॉन्स्टेबल हे पद हे कनिष्ठ पद आहे, तिने केलेल्या चुकीबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात आली मग कारवाई करण्याची हीच तत्परता सत्ताधारी पक्षाने सरन्यायाधीशांच्या या प्रकरणात का दाखवली नाही?

यावरून एक गोष्ट लक्षात येते की भारतातील सत्ताधारी पक्षाला हिंदूंची आठवण फक्त निवडणुकीच्या वेळेला होते, त्यांनी हिंदूंना गृहीत धरलं आहे की काहीही झालं तरी हे आपल्यालाच मत देतील. पण इथे एक सत्य लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक राजकारणी हा पक्का संधी साधू असतो. त्यांना काहीही करून सत्ता हवी असते. त्यामुळे जर कुणाची अशी आशा किंवा अपेक्षा असेल की भारतातील सत्ताधारी पक्ष किंवा त्या सत्ताधारी पक्षाचा सर्वोच्च नेता सरन्यायाधीशांवर कारवाई करतील तर असं काहीही होणार नाही कारण शेवटी सत्ता महत्वाची आहे.

देव, देश आणि धर्म: हिंदुत्वाची मूलभूत त्रिसूत्री
ऑगस्ट २०२४ ला बांगलादेश मध्ये सत्तापालट झाले, सत्तापालट झाल्यावर आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना देश सोडून पळावं लागलं. सत्तापालट झाल्यावर बांगलादेश मध्ये अराजकता माजली आणि अशावेळी बांगलादेशी हिंदूंवर भरपूर अत्याचार झाले. याच दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत एका राजकीय सभेत सूचक विधान केलं की "बटेंगे तो कटेंगे". अगदी छोटंसं असणाऱ्या या वाक्याच्या प्रभाव मात्र खूप मोठा होता. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानाने हिंदू समाजात आपण सर्व हिंदूंनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे हा महत्वाचा संदेश सर्व हिंदूंपर्यंत पोचवला.

ज्या प्रमाणे "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेने हिंदूंना एकतेचं महत्व पटवून दिलं, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट राकेश किशोर यांच्या "सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान" या घोषणेने हा संदेश पोचवला की भारतातला हिंदूंचा धर्माभिमान हा जागृत झाला आहे. आणि आता हा जागृत झालेला हिंदू त्यांच्या देवाचा, धर्माचा, आणि प्रथांचा  अपमान सहन करणार नाही. या प्रकरणाचे तात्पर्य हेच आहे की हिंदूंनी कायम देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपल्या देवाचा, देशाचा, धर्माचा आदर राखणे हे प्रत्येक हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींच्या बाबतीत हिंदूंनी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. कारण आपण आपल्या देवाचा, देशाचा, धर्माचा आदर केला नाही तर दुसरे ही करणार नाहीत.

जर थंड डोक्याने आपण या प्रकरणाचा विचार केला तर आपल्याला काही मुद्दे लक्षात येतील. २०२४ साली बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार झाले आणि त्यानंतर बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली गेली ज्यामुळे हिंदूंमधील एकता जागृत झाली. २०२५ साली भारताच्या सरन्यायाधिशाने हिंदू देवतांबद्दल एक वादग्रस्त व अपमानजनक विधान केलं त्याचा परिणाम म्हणून सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान ही घोषणा दिली गेली ज्यामुळे हिंदूंमधील धर्माभिमान जागृत झाला. भारतातील सत्ताधारी पक्षाने किंवा त्या सत्ताधारी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने जी भूमिका मांडली त्यावरून यांचं प्राधान्य कशाला आहे ते समजलं. या प्रकरणाबद्दल ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या मुद्दयांवर जे विचार मांडले त्यावरून ते किती हिंदुत्ववादी आहेत हे समजलं. पूर्वी हिंदूंबद्दल कोणी वादग्रस्त किंवा अपमानास्पद टिप्पणी किंवा विधान केलं तर हिंदूंचं मानसिक खच्चीकरण व्हायचं, पण आता मात्र हिंदू धर्माभिमानी होऊन एकत्र येऊन सशक्त होत आहेत. त्यामुळे या अशा वादग्रस्त प्रकरणात हिंदूंना वेगळ्या दृष्टीची नाही तर दृष्टीकोनाची गरज आहे. थोडक्यात हे प्रकरण हिंदूंसाठी ब्लेसिंग इन डिसगाइस आहे, फक्त या प्रकरणाशी जोडलेल्या सर्व मुद्द्यांवर थंड डोक्याने विचार करायची आवश्यकता आहे. हा विषय न संपणारा आहे. आता कोण बरोबर आणि कोण चूक हे ज्याचं त्याने ठरवावं.

© वेदांग देशपांडे

Comments

Popular posts from this blog

माणूस नावाचं सुंदर शिल्प: यशाची व व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली

ट्रम्प तात्यांच्या टॅरिफचं तुणतुणं : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा आढावा