Posts

Showing posts from August, 2025

ट्रम्प तात्यांच्या टॅरिफचं तुणतुणं : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा आढावा

Image
२० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळिसावे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार प्रणाली पूर्णपणे बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. २० जुलै २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून पहिले सहा महिने पूर्ण केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या सहा महिन्यात विविध देशांच्या विविध वस्तूंवर टॅरीफ अर्थात आयात शुल्क लावून व्यापार युद्ध सुरु केले आहे. आता लोकांना वाटेल की ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विविध देशांवर आक्रमकपणे आयात शुल्क (टॅरीफ) लादत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की ते फक्त त्यांच्या पहिल्या कार्यकाळात वापरलेली टॅरीफ रणनीती पुढे चालू ठेवत आहेत. थोडक्यात काय तर ट्रम्प त्यांच्या टॅरीफचं तुणतुणं परत एकदा वाजवत आहेत. या टॅरीफ युद्धाची सुरुवात २०१७ साली झाली. ट्रम्प प्रशासनाच्या सर्व कृतींच्या मुळाशी एक मध्यवर्ती धोरण आहे आणि ते धोरण म्हणजे अमेरिका फर्स्ट "America First". अमेरिका फर्स्ट या धोरणाचा अर्थ काय तर अमेरिकन व्यवसाय आणि कामगारांना प्राधान्य देणे....