यमाष्टकम : कर्म, धर्म, व उत्क्रांतीचं रहस्य उलगडणारं अष्टक
यमधर्मांच्या स्तुती प्रीत्यर्थ ज्या अष्टकाची रचना केली गेली त्याला "यमाष्टक" असं म्हणतात. मानवाच्या कर्मप्रधान जीवनात लागणारी "नैतिक तत्त्वं" आणि त्याच नैतिकतेच्या आधारावर होणारी "मानवाची उत्क्रांती" याबद्दल यमाष्टक भाष्य करतं. या यमाष्टकाची रचना करताना व त्यातील श्लोकांचे अर्थ समजावताना लेखकाने आपल्या सनातन हिंदू धर्मातील "योग वाशिष्ठ", "ऋग्वेद", "ऐतरेय उपनिषद", "कठोपनिषद", "दुर्गासप्तशती", "पातंजल योग दर्शन" या प्राचीन ग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत. आता यमाष्टक समजून घ्यायचं असेल तर आधी 'यम' म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. 'यम' हा शब्द 'यमन' या शब्दातून निर्माण झाला. मनाला नियंत्रित व संयमित करून चांगलं वळण लावणे म्हणजेच यमन करणे होय आणि हे यमन ज्याने सर्वप्रथम केलं तो म्हणजे यम. यमाष्टकाची सुरुवात ही परमेश्वराच्या पंचकृत्यांच्या उल्लेखाने होते. ही समस्त सृष्टी या पंचकृत्यांवर आधारित आहे. मानवाची उत्क्रांती ही त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते आणि ही 'नीतिमत्ता...